वकिलाने फी म्हणून क्लायंटकडून घेतले रोख 217 कोटी; 38 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली – काही वकील फी म्हणून तगडी रक्कम घेत असतात. प्रकरण जेवढे मोठे तेवढी जास्त फी वकिलांकडून घेण्यात येते. एका वकीलाने फी म्हणून क्लायंटकडून तब्बल 217 कोटी रूपये घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना चंदीगडमध्ये घडली आहे. कर चुकवल्याच्या आरोपावरून आयकर विभागाने या चंदीगडमधील एका प्रसिद्ध वकिलावर छापा टाकला आहे. मीडिया अहवालानुसार, एका डिपार्टमेंटमधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली असून माहितीनुसार आयकर विभागाने या वकिलाशी संबंधीत असलेल्या तब्बल 38 ठिकाणांवर छापा टाकला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. छापा टाकण्यात आलेल्या  ठिकाणांमध्ये हरियाणा, दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणं आहेत. या कारवाईत 5.5 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीडीटीने एका निवेदनात दिली आहे. तसेच वकिलाशी संबंधीत असलेले 10 लाॅकर देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. बोर्डाने वकीलाची ओळख पटवली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here