तिकीट आरक्षणाबाबतीत रेल्वेने आजपासून नियमात बदल केला असून यानुसार आता ट्रेनमध्ये तिकीट आरक्षणाचा दुसरा तक्ता प्रस्थानापूर्वी अर्धा तास अगोदर जारी केला जाणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार..:
▪️ कोरोना संकटापूर्वी दिशानिर्देशांनुसार पहिला आरक्षण तक्ता ट्रेन निघण्याच्या निर्धारित वेळेच्या 4 तास अगोदर तयार व्हायचा.
▪️ यामुळे दुसऱ्या तक्त्यात ‘प्रथम या-प्रथम मिळवा’ तत्वानुसार उपलब्ध जागा पीआरएस काऊंटर आणि इंटरनेट बुकिंगच्या माध्यमातून दिल्या जायच्या.
▪️ तसेच ट्रेन निघण्याच्या 30 ते 5 मिनिट अगोदर दुसरा आरक्षण तक्ता तयार केला जात होता. अगोदर बुक तिकिटांवर रिफंड देण्याची तरतूद नियमात आहे.
▪️ कोरोनाकाळात अर्ध्या तासाचा नियम बदलून तो 2 तास करण्यात आला होता. मात्र आता विभागीय रेल्वेच्या विनंतीनंतर प्रवाशांच्या सोयीसाठी हा नियम पुन्हा अर्धा तास करण्यात आला आहे.
दरम्यान, सदरील नियमामुळे आता दुसरा आरक्षण तक्ता तयार होण्याच्या अगोदर ऑनलाइन आणि पीआरएस तिकीट काऊंटरवर तिकीट बुकिंग उपलब्ध होणार आहे