राज्यात येत्या चार ते पाच दिवस या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

    891

    राज्यात येत्या चार ते पाच दिवस या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

    काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कमी झाल्या नंतर आता पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही भागात असलेल्या ढगाळ हवामानामुळे तुरळक ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

    उत्तर भारतातून लवकरच परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. त्यातच मध्य महाराष्ट्र ते कोमोरीन परिसर व कर्नाटक आणि केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने तुरळक ठिकाणी काही प्रमाणात दुपारनंतर ढग जमा होत आहे. यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडत आहे.

    तर दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान ढगाळ तर अधूनमधून ऊन पडत होते.

    मराठवाडा व विदर्भातही उन्हाचा चटका वाढला होता. शुक्रवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यत नागपूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेलिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. पुण्यातही सरासरीच्या तुलनेत उणे एक अंश सेल्सिअसने कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उकाड्यात सकाळपासून वाढ होत आहे.

    येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात तुरळक सरी पडतील. रविवारपासून (ता.२७) राज्यातील काही भागात काही अंशी ढगाळ राहणार असून अनेक भागात ऊन पडेल. त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडणार असून तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here