राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील.

707
  • कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील.
  • ……………………..
  • या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देणारे ५,४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
  • अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
  • ……………..
  • संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ,केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रत्येकी १००० रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • ……………..
  • शिवभोजन योजनेतून एक महिना शिवभोजन थाळी मोफत
  • राज्यातील नोंदणीकृत सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद
  • ……………………..
  • फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यात येईल.
  • राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसहाय्य
  • आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब २००० रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • ……………………
  • याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.
  • …………………
  • स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
  • …………………….
  • लष्करी तज्ज्ञांच्या मदतीने हवाई वाहतुकीने ऑक्सिजन आणणे शक्य आहे का आणि शक्य असेल, तर नुसती परवानगी नव्हे, तर हवाई दलाला सांगून मदत करायचे आदेश द्यावेत अशी विनंती पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
  • ………………………..
  • मार्च महिन्यात जीएसटीचा परतावा दाखल करायची मुदत असते. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही मुदत तीन महिन्यांनी वाढवावी अशीही विनंती.
  • या संकटाला नैसर्गिक आपत्तीचे निकष लावावेत.
  • लसीकरणाचा वेग आणखी वाढवावा लागणार आहे. आत्ताची लाट प्रचंड मोठी आहे. परंतु लसीकरणामुळे या लाटेच वेग मंदावू शकतो.
  • …………………….
  • या बंधनांमागे प्राण वाचवणं हाच एक उद्देश आहे. आपण समर्थपणे मुकाबला करतोय. आजवर सहकार्य केलंत, मला कुटुंबातील एक मानलंत. मी टीकेची पर्वा न करता आपल्याशी असलेली बांधिलकी स्मरून माझ्या राज्यातील जनतेच्या हितासाठी हे निर्बंध लादतोय.
  • कृपा करा, न रागावता, न चिडता समजून घेत सहकार्य करा. ही लढाई जिंकायला मदतच नाही तर सैनिक म्हणून सोबत या. यापुढेही तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
  • जय हिंद! जय महाराष्ट्र!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here