राज्यात बरे होणाऱ्यांचं प्रमाण 80 टक्क्यांवर
राज्यात गेल्या सहा दिवसात 88 हजार 678 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख 53 हजार 653 वर पोहोचली. तर, या सहा दिवसात तब्बल 93 हजार 426 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात 4 ऑक्टोबर रोजी 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 15 हजार 048 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.
3 ऑक्टोबर रोजी 14 हजार 348 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 16 हजार 835 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.
तसेच 2 ऑक्टोबर रोजी 15 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 13 हजार 294 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.
➖➖➖➖➖➖➖