राज्यात लॉक डाऊन लावण्याबाबत सरकारची चर्चा, मुख्यमंत्र्यांनी बोलावली उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक, वाढती रुग्णसंख्या आणि कडक निर्बंध लादूनही परिस्थितीत बदल नाही, त्यामुळे कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत उद्या पुन्हा चर्चा होणार, त्यामुळे सरकार लॉकडाऊनच्या बाबत विचार करत असल्याची चर्चा, उद्या बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,राज ठाकरे बैठकीला उपस्थित असणार आहेत.
“राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं