राज्यात पुठील तीन दिवस मुसळधार पाऊस :हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

राज्यात आणखी पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मध्यम तसंच तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा इशारा आहे. 21 ऑक्टोबरला दक्षिण कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

22 ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी केएस होसाळीकर यांच्या सांगण्यानुसार, ‘पुण्यातील स्थिती अधिक तीव्र असेल. रडारवर 10 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीचे ढग पाहायला मिळाले असल्याने त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here