राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला दसरा-दिवाळी पूर्वी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी

महोदय, संपूर्ण राज्यात प्रचंड अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडील मागील कर्जवसुली थांबविण्यात येऊन नवीन कर्ज शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तात्काळ उपलब्ध करुन द्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारने जमीन उपलब्ध करून घेऊन शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी तसेच जे माणसे मृत्युमुखी पडली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत आणि पशुधन होणारे नुकसान भरपाई मिळावी. तसेच जिरायती बागायती आणि फळ भागांचा योग्य मोबदला हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावा. यासह विविध राज्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून वरील निर्णय सरकारने तात्काळ घ्यावा.असे निवेदन सिन्नर तहसीलदार राहुल कोटाडे यांना देवून अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने,संकेत चिने श्रीपाद चिने कुणाल महाले निलेश चिने शुभम चिने,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here