राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

786

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)

राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

कोरोना काळातील आर्थिक संकटातून उभं करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांसमवेत बैठक

राज्यातील शेकडो लोककलावंत,लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.

याचा फायदा शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी,तमाशा फड, दशावतार, नाटके, झाडीपट्टी, सर्कस, टुरिंग टॉकीज, विधी नाट्य यामधील कलाकारांना होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here