राज्यातील कोविड परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रमुख पक्षांचे नेते व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे :

731
  • राज्यातील कोविड परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रमुख पक्षांचे नेते व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे :
  • कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.
  • प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे.
  • ………………………
  • विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत
  • रेमेडीसिवीर उपलब्धता,चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे,ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा सूचनांवर शासन कार्यवाही करेल
  • ……………
  • आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे.
  • गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते.
  • आता सर्व खुले झाले आहे त्यामुळे यात व्यावहारिक अडचणी येतात हे केंद्राने समजून घ्यावे.
  • ………………….
  • लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे
  • युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय
  • दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग,रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे
  • सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरवले पाहिजे.
  • ……………………….
  • कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने विचार सुरू आहे.
  • कोरोना सर्वांनाच टार्गेट करीत आहे. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागात आणि क्षेत्रात आहे. त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो.
  • ………………………
  • सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्यास सहकार्य द्यावे
  • रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल
  • ………………………………..
  • एका बाजूला जनभावना आहे दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक.अशात ही लढाई जिंकण्यासाठी थोडी कळ तर काढावीच लागेल
  • मी विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतोए, काल खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी बोललो.शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे
  • टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे म्हणणेही विचारात घेत आहोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here