_ _
केंद्रशासित प्रदेश, राज्ये आणि खासगी रुग्णालयांमध्ये 3 कोटी 20 लाख लसमात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सांगितले आहे.
आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 43 कोटी 79 लाख 78 हजार 900 लसमात्रा पुरवण्यात आल्या असून अजून 7 लाख मात्रा लवकरच देण्यात येणार आहेत.
- ‘इतक्या’ कोटी लसींचा वापर -*
▪️उपलब्ध साठ्यानुसार वाया गेलेल्या लसमात्रांसह आतापर्यंत एकूण 40 कोटी 59 लाख 77 हजार 410 लसमात्रांचा वापर करण्यात आला आहे.
_ तर 3 कोटी 20 लाख 1 हजार 490 लसमात्रा शिल्लक आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने लसींच्या पुरवठ्याबाबत होणाऱ्या आरोपावरून उत्तर दिले आहे._
दरम्यान, लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.