रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव !
अहमदनगर : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी हि माहिती दिली आहे.
आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी बाजार समितीत कांदा लिलाव झाले या लिलावात एक नंबर कांद्याला ४४ रुपयांपासून ५१ रुपये भाव मिळाला असून दोन नंबर कांद्याला ३४ ते ४३ रुपये
तर तीन नंबर कांद्याला २२ ते ३३ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे आज रोजी बाजार समितीत १३हजार ३३० कांदा गोण्यांची आवक झाली केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली होती
त्यामुळे भाव गडगडण्याची श्यक्यता मांडण्यात आली होती परंतु पारनेर बाजार समितीत कांद्याला ५१ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.