मोठी बातमी: तनपुरेंच्या कामगारांच्या १४ दिवसापासून सुरू असलेले उपोषण सुटले
राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार बांधवानी आपल्या थकीत देणीसाठी गेल्या १४ दिवसापासून सुरू केलेले उपोषण रविवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुटले आहे.२३ ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे तनपुरे कारखाना कामगार बांधवानी उपोषण तथा विविध आंदोलन सुरू ठेवले होते. तनपुरे कारखान्याचे तज्ञ संचालक खा.सुजय विखे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी कामगारांशी १ तास चर्चा केली होती. मात्र त्यांनतर कामगार आपल्या आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर चेअरमन नामदेव ढोकणे यांनी लेखी प्रस्ताव दिला होता तो कामगारांनी मान्य केला नव्हता.दरम्यान आज माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले, चेअरमन नामदेव ढोकणे ,उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, संचालक मंडळ तसेच भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे तसेच पत्रकार विनीत धसाळ, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे, सुबोध विखे यांनी उपोषण कर्त्या कामगारांपुढे लेखी प्रस्ताव ठेवला.तो प्रस्ताव आंदोलक कामगारांनी मान्य केल्या आहेत. यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन कामगारांचे उपोषण सोडण्यात आहे.