अहमदनगर प्रतिनिधी-:
दिनांक 14 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 दरम्यान बाळू काशिनाथ जगधने व अजिनाथ काशिनाथ जगधने यांच्या पाणी उपसा करणाऱ्या तीन मोटरी चोरी गेल्या होत्या.
सदर मोटरीचा शोध न लागल्याने बाळू काशिनाथ जगधने राहणार मुळेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुरंन. 253/ 2021 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 24/04/2021 रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर मोटर चोरीबाबत कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदार यामार्फत माहिती मिळाली की, सदर मोटरी ह्या देवा मोहन वायसे, रा. मुळेवाडी याने चोरी करून शब्बीर महबूब शेख, रा. मिरजगाव, तालुका कर्जत यांचेकडे दिल्या आहेत. अशी माहिती मिळाली पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदार प्रबोध हंचे , भाऊसाहेब यमगर, श्याम जाधव यांना बातमी च्या ठिकाणी मिरजगाव येथे पाठवून त्या ठिकाणी खात्री केली असता तेथे शब्बीर महबूब शेख, राहणार मिरजगाव याच्या ताब्यात मुळेवाडी येथील चोरीच्या तीन पाणी उपसा मोटरी मिळून आल्या. शब्बीर शेख कडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, देवा मोहन वायसे राहणार मुळेवाडी तालुका कर्जत याने मोटर आणून विकल्या आहेत असे सांगितले.
त्यामुळे सदर गुन्ह्यात आरोपी नामे शब्बीर महबूब शेख, रा. मिरजगाव, ता. कर्जत याला अटक करण्यात आली असून देवा मोहन वायसे, रा. मुळेवाडी, तालुका कर्जत हा फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम कर्जत पोलिसांकडून सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास हा
मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब, अ.नगर
मा्. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल साहेब, अ.नगर
मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव, कर्जत विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन , पोउपनी रमेश साळुंखे, सपोनि सुरेश माने,पोलीस अंमलदार श्री प्रबोध हंचे, भाऊसाहेब यमगर, सुनील मालशिखरे श्याम जाधव, विकास चंदन, अमित बर्डे, सुनील खैरे यांनी केली आहे.