मुंबई उच्च न्यायालायने पुन्हा रिपब्लिक पब्लिक टीव्हीला फटकारलं

नवी दिल्ली – सुशांतसिंह याच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्ही अत्यंत बेजबाबदार व बिनबुडाच्या बातम्या प्रसारित करून हिंदी चित्रपटसृष्टीची व त्यातील कलाकारांची बदनामी केली असून या वाहिन्यांना असे बेजबाबदार वार्तांकन करण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी एक याचिका निर्माते व कलाकारांच्या संघटनांच्यावतीने काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली.

तर यातच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायने पुन्हा एकदा रिपब्लिक टीव्हीला फटकारलं आहे.

मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांनी चॅनेलकडून सुरु कऱण्यात आलेली हॅशटॅग मोहीम तसंच प्रसारित करण्यात आलेल्या काही बातम्यांचा संदर्भ यावेळी दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, तपास सुरु असताना कोणाला अटक केली जावी अशी विचारणा प्रेक्षकांना करण्यासंबंधी तसंच शोध पत्रकारितेच्या नावे एखाद्या व्यक्तीच्या हक्कांचं उल्लंघन करण्यासंबंधी न्यालयाकडून रिपब्लिक टीव्हीला फटकारण्यात आलं.

“तुम्ही एका महिलेचं वर्णन असं केलं की तिच्या हक्कांचे उल्लंघन झालं आहे, हे आमचं प्राथमिक मत आहे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. शुक्रवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here