मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचे निधन
16 सप्टेंबर :- झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजीमधील एका हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रशांत लोखंडे याचे १४ सप्टेंबर ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत कोंडाजी बाबा यांना मुरुड जंजिरा किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी अब्दुला दळवी यांनी मदत केली होती आणि हेच अब्दुल्ला दळवीपात्र प्रशांतने साकारले होते.
अभिनेता प्रशांत लोखंडे याने १४ सप्टेंबर ला रात्री जगाचा निरोप घेतला आहे. इतक्या कमी वयात निधन झाल्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.
अब्दुला दळवी यांचा “बाद में कटकट नको” हा डायलॉग प्रशांत लोखंडे यांनी प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवला.
प्रशांत यांनी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत “बाजी घोरपडे” हे पात्र देखील उत्तमरित्या साकारले होते.
या उत्तम कलाकाराच्या अचानक जाण्याने मित्र परिवार व अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान झी मराठी वाहिनीवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका खूपच गाजली होती.