मान.श्री.आर.जी.सातपुते साहेब यांना “कोरोना योध्दा” सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.

संपूर्ण भारत एकजूट होऊन कोरोना महामारी शी लढत आहे. अशा कठीण परिस्थितीतही समाज आणि समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवा कार्य अतुलनीय आहे. या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. अशा धैर्याला आणि उर्मीला मानवाधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली सलाम करीत असुन अहमदनगर महानगर पालिका पाणी पुरवठा विभाग प्रमुख, मान.श्री.आर.जी.सातपुते साहेब यांना “कोरोना योध्दा” सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.
मानवाधिकार संरक्षण समिती, नवी दिल्ली या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री.शिवाजीराव पाटील (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), श्रीमती इंदु रा.यादव (महाराष्ट्र महिला अध्यक्षा), श्री.प्रवीन ह.गायकवाड (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष), श्री.जी.एम.भगत (प.म.राज्य जन सं.अधिकारी), श्री.एस.एम.गावडे (अहमदनगर जिल्हाध्यक्ष) या सर्व प्रमुख पदाधिकारींच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे.
अहमदनगर महानगर पालिकाचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख मान.श्री.आर.जी.सातपुते साहेब यांचे सर्वच स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here