माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

लखनऊ दिल्ली 21 ऑगस्ट : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं निधन झालं (Kalyan Singh Passes Away)आहे. 4 जुलैपासून कल्याण सिंह पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल होते.आयसीयूमध्ये चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण नंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.21 जूनला ब्लड शूगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here