माजी नगरसेवकाच्या वाहनाचा अपहार

पिंपरी – दोन दिवसांसाठी नेलेली कार साडेतीन महिन्यानंतरही परत केली नाही. याप्रकरणी माजी नगरसेवकाने आपल्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 जुलै 2020 रोजी चिंचवड येथे घडला.
गणेश नारायण लोंढे (वय 43, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) फिर्याद दिली आहे. अशोक खरात (रा. किवळे रावेत) असे आरोपी मित्राचे नाव आहे.
माजी नगरसेवक लोंढे यांच्याकडे एमएच-14-जीवाय-4113 ही इनोव्हा कार आहे. 12 जुलै 2020 रोजी आरोपी खरात आणि त्याचा मित्र सागर कांबळे याने खरात याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी दोन दिवस बाहेर जाण्याचे कारण सांगून इनोव्हा नेली. मात्र अद्याप ती परत न देता फसवणूक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here