माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या अडचणीत वाढ: जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.दिवाळीच्या दरम्यान सौ कोतकर यांना तात्पुरता जामीन मिळाला होता. परंतु आज जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

केडगाव येथे सात एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्ह्यात सुवर्णा कोतकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. हा तपास प्रथम स्थानिक पोलिस व त्यानंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून सुवर्णा कोतकर या फरार होत्या. मागील महिन्यात कोतकर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकारी यांनी न्यायालयात अर्ज केला होता.

कोतकर यांच्यावतीने नितीन गवारे तर सरकारी पक्षाच्यावतीने केदार केसकर यांनी युक्तिवाद केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित शेटे यांच्यसमोर या अर्जावर सुनावणी झाली होती. न्यायालयाने या प्रकरणावर मंगळवारी निकाल देत जामीन अर्ज फेटाळून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here