माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोरोनाबाधित
अहमदनगर : कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मंगळवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमधून चाचणी केलीअसता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
पुढील उपचारांसाठी त्या नाशिकला रवाना झाल्याचे, तसेच त्यांच्या स्वीय सहायकलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.