महा हेडलाईन्स, 11 ऑगस्ट 2021

736

खेलरत्नचा वाद सुरू असताना ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्य सरकार राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच 20 ऑगस्टला देणार ‘राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार’

✒️ तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

✒️ नंदुरबार जिल्ह्यातील पुष्प दंतेश्वर साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी; राज्य सहकारी बँकेचे कारखान्यावर 36 कोटी रुपयाचे कर्ज थकीत असल्याने काढला होता लिलावात

✒️ लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर: एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर

✒️ महाराष्ट्रात 66,123 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 61,59,676 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,34,201 रुग्णांचा मृत्यू

✒️ ओबीसी जनमोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय आरक्षणासह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा; प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी दिले निर्देश

✒️ नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ताब्यात; आठ लाखांच्या लाच प्रकरणी ठाणे एसीबीची कारवाई, कारचालक आणि एक प्राथमिक शिक्षकही जाळ्यात

✒️ भारतात 3,80,895 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,12,10,624 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,29,183 रुग्णांचा मृत्यू

✒️ आयटी कायद्यातील दुरूस्तीला तात्पुरती स्थगिती का देऊ नये? हायकोर्टाचा केंद्र सरकारला सवाल; केंद्र सरकारला तातडीनं याचिकेतील मुद्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

✒️ कुस्तीपटू विनेश फोगट टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तभंग केल्याने निलंबित; भारतीय कुस्ती महासंघाने नोटीस बजावून 16 ऑगस्टपर्यंत उत्तरे मागितली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here