महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायदा; नराधमांना 21 दिवसांत फाशी
महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेल्या आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर बनविण्यात आलेल्या शक्ती कायद्याची दोन विधेयके सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत मांडली.
‘शक्ती’ कायद्यातील तरतूदी-
21 दिवसांमध्ये खटल्याचा निकाल, बलात्कार, अॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडाची तरतूद आहे.
विश्वासू किंवा जवळच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यास मृत्युदंड आणि 16 वर्षांखालील मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कार या गुन्ह्यांतही मृत्युदंडाची तरतूद या विधेयकात आहे.
महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
महिला व बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठीच्या गुन्ह्यात 15 दिवसांत गुन्ह्याचा तपास आणि आरोपपत्र दाखल करावे आणि आरोपपत्र दाखल झाल्यावर 30 दिवसांत सुनावणी पूर्ण व्हावी, अशीदेखील तरतूद आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले”, महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केले. यावर चर्चा होईल. गुन्हेगारांना या कायद्यामुळे जरब बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा द्यावा”, अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.