मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार बाजू मांडण्यात कमी पडले

    754

    मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार बाजू मांडण्यात कमी पडले !

    अहमदनगर :- मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आरोप सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश झगरे यांनी केला.

    मराठा समाजाचे नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भात घटनापीठानेही सुनावणी जलदगतीने घेऊन त्वरित योग्य तो व सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली.

    मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती संदर्भात बोलताना गणेश झगरे म्हणाले, अनेक लढ्यानंतर मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागला होता,

    मात्र त्यावेळच्या सरकारने बाजू व्यवस्थितपणे मांडली नसल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. याबाबत मराठा सुकाणू समिती जिल्हाभर आंदोलन छेडणार असल्याचेही झगरे यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here