भावपूर्ण श्रध्दांजली*??भावपूर्ण श्रध्दांजली??* आमच्या अहमदनगर बार असोसिएशनचे एक विद्यमान ज्येष्ठ सदस्य *अँड. किसनराव काशीद साहेब Retd.Colonel.Gorakha Regiment *यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. कर्नल काशीद साहेब भारतीय लष्कर सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी परत सुमारे २४ वर्ष नगर जिल्हा न्यायालयात वकिली केली. कर्नल साहेबांचे घराणे सारोळा तालुका जामखेड येथील एक अति उच्च शिक्षित. कर्नल साहेबांचे मोठे भाऊ , १९७० साली नव्याने सुरू झालेल्या न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये माझे भूगोलाचे प्राध्यापक ,भूतपूर्व प्राचार्य नारायणराव काशीद. दुसरे एक बंधू जामखेड येथील काशीद हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर काशीद . कर्नल साहेब सुद्धा एल. एल. बी. झाल्यानंतर वकिली सुरु केलेली असताना लष्करी सेवेत सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आणि कालांतराने कॅप्टन, मेजर, लेफ्ट.कर्नल आणि कर्नल होऊन सेवानिवृत्त झाले. दरम्यानच्या काळात नियमाप्रमाणे वकिलीची सनद तहकूब ठेवून आर्मी जॉईन केली. कर्नल साहेब हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भूतपूर्व चेअरमन कै. साहेबराव पाटील यांचे जावई. कर्नल साहेबांनी नगर जिल्हा न्यायालयात परत वकिली सुरू केल्यानंतर आमच्या जुन्या जिल्हा न्यायालयातील ,लायब्ररी मध्ये नुसते समवयस्क नाही तर तरुण वकिलांच्या सहवासात बस्तान बसवलं. अतिशय सरळमार्गी मितभाषी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व. प्रत्येकास सहकार्य करण्यास उत्सुक. त्यांच्या वयाचा, पूर्वी लष्करी सेवेत असताना असलेल्या मानमरातबाचा, त्यांनीही कधीही गर्व केला नाही. अतिशय समंजस व्यक्तिमत्व. केंद्र सरकारचा अहमदनगर जिल्ह्याचा सरकारी वकील म्हणून २००३ मध्ये माझी नेमणूक झाली आणि अहमदनगरच्या कार्यरत असलेल्या लष्कराच्या आर्मर्ड कोअर सेंटर किंवा एम. आय . आर .सी असो किंवा व्ही. आर. डी. ई. किंवा सी. क्यु. ए. व्ही. कोणत्याही नगर कोर्टात आलेल्या लष्करातील , लष्करी गणवेशातील माणसाचा माझ्याशी त्वरित संपर्क करून देत आणि त्यांचा आणि माझा सुसंवाद करून देण्याचे मोलाचे काम ते करीत असत. काही वर्षांपूर्वी, एका कोर्ट मार्शलच्या केस मध्ये माझी, पहिल्यांदा प्रोसिक्युटींग कौन्सिल म्हणून नेमणूक झाली. नगरच्या दिवाणी आणि फौजदारी कोर्टातील माझ्या वकिलीच्या अनुभवाशिवाय वेगळ्या फोरम पुढे काम करायचे असल्याने, मला आठवण झाली कर्नल साहेबांची. त्यांच्या जामखेड रोड वरील फार्म हाऊस कम बंगल्यावर त्यांची भेट घेतली आणि त्यांचेकडून प्रोसिजर समजावून घेतले. त्यांनीही अनेक बारकाव्यासह सविस्तर चर्चा करून पहिल्या तारखेला समक्ष हजर राहून माझा उत्साह द्विगुणित केला. त्यांच्या गोरखा रेजिमेंटचा त्यांना अतिशय अभिमान आणि योगायोगाने कोर्ट मार्शल मध्ये सहभागी असलेले बरेच अधिकारी त्या रेजिमेंट मधले असल्याने एक वेगळाच माहोल तयार करून दिला. असे कर्नल अँड. के .ए. काशीद स्वर्गवासी झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. त्यांचे परिवाराचे दुःखात शहर बार च्या वतीने सहभागी होऊन त्यांना आदरांजली अर्पण करतो. अँड.सुभाष विठ्ठलराव भोर ता.१९ /०८/२०२१अहमदनगर.
ताजी बातमी
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे अथवा मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन...
नगरमध्ये शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न? आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल...
अहिल्यानगर शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून...
चर्चेत असलेला विषय
कुस्तीपटूंच्या वक्तव्यात विरोधाभास, ब्रिजभूषणचा दावा, कोर्टाने त्याला दोषमुक्त करण्याची विनंती केली
तक्रारकर्त्यांच्या विधानातील विरोधाभास दाखवून, भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांनी न्यायालयात युक्तिवाद केला...
औरंगाबाद येथील ओमायक्रॉन बधितावर मुंबईत उपचार.
कोरोना विषाणू चा नवीन प्रकार म्हणजे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. राज्यात रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबादच्या रुग्णाचा समावेश असल्याने...
होमिओपॅथी उपचार पध्दती कोरोनावर संजीवनी -डॉ. प्रमोद लंके
ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण होमिओपॅथी उपचाराने बरे
सर्वसामान्यांसाठी...






