मुंबई दि. २१ ऑक्टोबर – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले. गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
जिल्ह्यात रेमडेसिविर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन
जिल्ह्यात रेमडेसिविर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठीअन्न व औषध प्रशासन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापनजळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 - कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर...
कुस्ती महासंघाचे प्रमुख पद सोडणार, अनुराग ठाकूर यांची घोषणा; कुस्तीपटूंनी विरोध मागे घेतला
केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणाले की लैंगिक छळाच्या आरोपांशी लढा देत असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंग यांची एका निरीक्षण...
कोव्हिड सेंटरमधून महिलाच गायब ! आईने केले उपोषण सुरू…
कोव्हिड सेंटरमधून महिलाच गायब ! आईने केले उपोषण सुरू…
पुणे :- पुण्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असतानाच प्रशासनाचा भोंगळ...
बिपरजॉय ‘अत्यंत तीव्र’ चक्रीवादळात कमकुवत झाले, आयएमडीने इशारा जारी केला: अद्यतने
अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘सायक्लोन बिपरजॉय’ मंगळवारी अत्यंत तीव्र चक्री वादळात कमकुवत झाले, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)...





