बेदम मारहाण केली आणि google pay ने पैसे घेतले.

धक्कादायक! बेदम मारहाण केली आणि google pay ने पैसे घेतले.

पुणे- कोयत्याने व लाकडी दांडक्‍याने मारहाण करुन एका तरुणाकडून गुगल पेव्दारे पाच हजार रुपये घेण्यात आले होते. यातील दोघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, कोयता आणी गुन्हयात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
सार्थक संगीत मिसाळ(19,रा.दत्तनगर) व तेजस तुकाराम येनपुरे(19,रा.आंबेगाव खुर्द) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी हनुमान बापुराव फुलपगारे(26,रा.आंबेगाव) याला त्याच्या ओळखीच्या रोहीत पाटेकर याने पैसे मागीतले होते. मात्र त्यांनी नकार दिल्यावर पाटेकर याने त्याला जवळच्या खड्डा परिसरात नेले. तेथे पाटेकर व त्याच्या साथीदारांनी मिळून कोयत्याने व लाकडी काठीने जबर मारहाण केली. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने त्याच्या मोबाईलचे लॉक उघडण्यास भाग पाडले. यानंतर त्याच्या गुगल पे अकाऊंटवरुन 5020 रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतले. याप्रकरणाची फुलपगारे यांनी तक्रार दिलल्यावर पोलिस आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रणव संकपाळ व शिवदत्त गायकवाड यांना गुन्हयातील सार्थक व तेजस हे आरोपी एका दुचाकीवर टेल्को कॉलनी येथे थांबल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानूसार दोघांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसमवेत हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्रीधर पाटील, गणेश सुतार, निलेश खोमणे, शंकर कुंभार, प्रणव संकपाळ, समीर बागशिराज , हर्षल शिंदे, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर, प्रदिप शिंदे यांच्या पथकाने केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here