बिग बॉस मराठी ३’ लवकरच आपल्या भेटीला… कलर्स मराठी वाहिनीने केली अधिकृत घोषणा
लोकांची अतिशय लोकप्रियता मिळवलेला, तसेच अनेकदा वादग्रस्त ठरलेला असा शो म्हणजे बिग बॉस मराठी. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आलेल्या या शो ला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. २०१८ मध्ये याचे पहिले पर्व पार पडले .अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरं पर्व सुरु झालं, त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिव ठाकरे हा या पर्वाचा विजेता ठरला. त्यामुळे पुढील पर्व कधी सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. मात्र २०२०मध्ये कोरोनाचे संकट देशभरात असल्याने हे पर्व घेण्यात आलं नाही. पण आता अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कलर्स मराठीने बिग बॉस मराठी चे तिसरे पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली आहे.
‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठीवर’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ कलर्स मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे.
या पर्वात आता कोणाची निवड झाली आहे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. हो पण हे मात्र निश्चित आहे कि अभिनेते, दिग्दशर्क महेश मांजरेकर हेच या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत कारण महेश मांजरेकर यांनी नुकतच ट्विट करत म्हटलं आहे कि, ‘त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’