रेखा जरे खूनप्रकरण….बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज
नगर : रेखा जरे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेला बाळ बोठे अजून फरार असून त्याने नगरच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. ॲड.तवले यांच्या मार्फत त्यांनी अर्ज दाखल केला असून त्यावर ८ डिसेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान रेखा जरे खून प्रकरणी अटक असणारे फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे यांना न्यायालयीन कोठडी तर सागर उत्तम भिंगारदिवे व ॠषीकेश उर्फ टम्या वसंत पवार आदित्य सुधाकर चोळके यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कनिष्ठस्तर दिवानी न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांनी दिले.
दरम्यान, आज रेखा झरे यांच्या कुटुंबियांनी बाळ बोठे याच्यावर खळबळजनक आरोप करीत पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.