बालरंगभूमी परिषद आयोजित रत्नाकर मतकरी बालनाट्य लेखन प्रोत्साहन आणि सन्मान स्पर्धात्मक योजना

महा 24 News on Nov 3 बालरंगभूमी परिषद आयोजित रत्नाकर मतकरी बालनाट्य लेखन प्रोत्साहन आणि सन्मान स्पर्धात्मक योजना

बालरंगभूमी परिषदेने बालनाट्य लेखनाला उत्तेजन देण्याच्या हेतूने आणि बाल प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे लेखन व लेखक तयार करण्याच्या उद्देशाने बालनाट्य लेखन सन्मान स्पर्धात्मक उपक्रम जाहीर केला आहे. सदर उपक्रम रत्नाकर मतकरी बालनाट्य लेखन सन्मान उपक्रम म्हणून ओळखला जाईल. या उपक्रमा अंतर्गत मराठी बालनाट्य एकांकिका लिहिणाऱ्या लेखकांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ लेखन स्पर्धा नव्हे. या उपक्रमासाठी येणाऱ्या बालनाटिका बाल प्रेक्षकांसाठी योग्य व उचित वाटल्या तर अशा सर्वच नाटकांचा गौरव या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्तम, प्रशंसनीय अशा चार श्रेणीत मनोरंजक बाल नाटकांचा सन्मान करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट व उत्तम ठरलेल्या बालनाट्यकांना अनुक्रमे रुपये 2000 रुपये 1000 , 700 चा रोख पुरस्कार व प्रमाणपत्र दिले जाईल तसेच प्रशंसनीय ठरलेल्या बाल नाटकांना प्रमाण पत्राचा लाभ मिळेल. या उपक्रमा संबंधी महत्त्वाचा तपशील खालील प्रमाणे आहे. 1) बालनाट्य एकांक स्वरूपात मराठी भाषेत 35 ते 40 मिनिटांचे असावे. 2) बालनाट्य लेखन स्वच्छ अक्षरात किंवा टाईप केलेल्या स्वरूपात असावे. लेखकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि लेखकाचे सत्यापन पत्र सोबत असावे. सेंन्साँर सर्टिफिकेट असल्यास सोबत जोडावे. 3) नाटकाची प्रत पीडीएफ फाईल द्वारे बालरंगभूमी परिषदेच्या मेल आयडी वर पाठवावी. आणि त्याची सूचना परिषदेच्या संबंधित जिल्हा शाखेला द्यावी. 4) उपक्रमात भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही परंतु सदर लेखक बालरंगभूमी परिषदेचा सभासद असणे आवश्यक आहे. नसल्यास त्या लेखकाने परिषदेचा सभासद होऊन मगच या उपक्रमासाठी नाटिका पाठवायची आहे. 5) नाट्यलेखन मुलांसाठी असावे नाटिका बाल/किशोर/कुमार यापैकी कोणत्या वयोगटासाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा. 6) नाटकाचा विषय मुलांना आवडेल रुचेल असाच असावा. नाटकात मुलांच्या भावविश्वाचा मुलांच्या भावभावनांचा विचार असावा. मनोरंजन हा प्रधान हेतू असावा. भाषा मुलांना समजेल अशी त्यांच्या वयाची असावी. नाटकाचे शीर्षक, पात्रयोजना, घटना व प्रसंग, प्रयोग क्षमता हे सगळे घटक विचारात घेऊन नाटकाचे परिक्षण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 7) ज्या नाटकांना लेखनाचे पुरस्कार मिळालेले आहेत अशा बालनाटिका स्वीकारल्या जाणार नाहीत. कृपया अशा बाल नाटिका पाठवू नयेत. 8) स्वतंत्र लेखनाचा विचार केला जाईल. थोडक्यात भाषांतरित व अनुवादित नाट्य साहित्य मान्य केले जाणार नाही. प्रकाशित एकांकिका देखील या उपक्रमासाठी अपात्र आहेत. 9) *अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2020 ही आहे.* 10) *balrangbhumiparishad@gmail.com* यावर आपल्या नाटिका आणि प्रवेश अर्ज pdf फाईल मध्ये पोस्ट करावेत. 11) अर्ज व संहिता ईमेलवरच पाठवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here