मुंबई विमानतळ प्रशासनाचे सर्वेक्षण
मुंबई : बस, रेल्वेपेक्षाही विमानप्रवास सुरक्षित आहे, असे मत ९९ टक्के प्रवाशांनी सर्वेक्षणातून व्यक्त के ले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले.
देशभरात टाळेबंदी हळूहळू शिथिल होताच अनेकांनी कामानिमित्त रेल्वे, बस आणि विमानप्रवास सुरू के ला. विमान प्रवासातही लक्षणीय वाढ होऊ लागली. यात व्यवसायानिमित्त आणि विश्रांतीसाठी पर्यटनाला जाणाऱ्यांचाही समावेश होता. करोनाकाळात प्रवासादरम्यान दिलेल्या निकषांचे पालन करत विमानप्रवास सुरळीत होऊ लागला.
गोवा, के रळ, उत्तराखंडसारख्या राज्यांनी तर आपल्या सीमा पर्यटनासाठी खुल्या के ल्या असून कमीत कमी र्निबध घातले. तसेच कोविड चाचणी किं वा नोंदणीशिवाय ही राज्य प्रवासी स्वीकारत असल्याने येत्या महिन्यात ६१ टक्के प्रवाशांनी विश्रांती व व्यवसायाच्या निमित्ताने पुन्हा विमानप्रवासाची तयारी दर्शवली आहे.
सुरक्षित प्रवास असल्याने सप्टेंबर महिन्यात प्रवास के लेल्या ८४ टक्के प्रवाशांनी या प्रवासाबाबत अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून मत व्यक्त के ले आहे. ९९ टक्के प्रवाशांनी बस, रेल्वेपेक्षा विमानप्रवासाला अधिक पसंती दिली आहे, तर ९९.९० टक्के प्रवाशांनी पुन्हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त के ली. चांगल्या सुरक्षित तपासणीसाठी ७९.९० टक्के प्रवाशांनी आणि बॅगेज ड्रॉपसाठी ७५ टक्के प्रवाशांनी मानांकन श्रेणी दिली आहे. विमानतळावर खरेदी, खाद्यपदार्थ सेवा, प्रवासादरम्यान जेवणाची व्यवस्था आदींबद्दलही समाधान व्यक्त केले आहे.