बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेला अश्लील मेसेज, नगर शहरातील घटना

    234

    अहिल्यानगर-येथील 27 वर्षीय विवाहित महिलेला बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे पाठवण्यात आलेल्या अश्लील मेसेज व व्हिडीओंच्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार 6 जून 2025 ते 16 जून 2025 दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेच्या अधिकृत आयडीवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले. सुरुवातीला मेसेज आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सवाद सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    प्रथम महिलेने याकडे दुर्लक्ष केले, परंतु वारंवार येणाऱ्या मेसेजमुळे दोन दिवसांनी तिनें प्रतिसाद दिला.यानंतर त्या बनावट आयडीवरून महिलेचा वैयक्तिक फोटो स्टोरीवर टाकण्यात आला आणि त्यासोबत अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आले. यामुळे महिलेने तातडीने आयडी ब्लॉक केली. मात्र, तिच्या पतीने ती आयडी पुन्हा अनब्लॉक करून चॅटिंग करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही अश्लील आणि अवमानकारक संदेश प्राप्त झाले. काही दिवसांनंतर इतर बनावट आयडीवरूनही तसेच मेसेज व फोटो पुन्हा पाठवले गेले.

    या त्रासाला कंटाळून महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार तक्रार दाखल केली असून, संबंधित चॅटिंगचे स्क्रीनशॉट व पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांकडून सुरू आहे. बनावट आयडी तयार करून महिलेला मानसिक व सामाजिक त्रास देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here