फास्टॅग नसेल तरी आता नो टेन्शन! नाही भरावा लागणार दुप्पट टोल; जाणून घ्या कसं?

फास्टॅग नसेल तरी आता नो टेन्शन! नाही भरावा लागणार दुप्पट टोल; जाणून घ्या कसं?

1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

तुमच्याकडे फास्टॅग नसल्यास तुमची कार टोल पार करू शकणार नाही. मात्र एका विशेष सेवेचा वापर करून, फास्टॅग नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचता येतं.

ही सुविधा येईल कामी :-

जर फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे.

असा घ्या लाभ :-

गाडीवर फास्टॅग नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता.

प्रीपेड कार्ड फास्टॅग असल्यावरही वापरता येतं. फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास टोल कर भरण्यास या कार्डचा वापर करता येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here