प्रकाश आंबेडकरांकडून मोदींचा दारुडे असा उल्लेख करण्यात आला. प्रकाश आंबेडकर सोलापुरातील सांगवी बुद्रूक येथे पाहणी दौरा करण्यासाठी गेले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा उल्लेख केला. *नरेंद्र मोदी सगळं काही विकायला निघाले आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली.* *“हिंदीत ‘कवाडी’ म्हणतो ना तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या कसा दारुला पैसा मिळाले नाही म्हणून बायकोला मारतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा तो घरातील सामान वैगेरे विकतो आणि ते संपलं की तो आपलं घरच विकतो…मोदी या देशाचे पंतप्रधान नसून दारुडे आहेत. म्हणून सगळं विकायला निघालेत अशी परिस्थिती आहे”.* “पंतप्रधान रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी विकत आहेत? जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच अशा पद्धतीने विकायला काढलं जातं,” अशी टीका त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे तीन पायाचं आहे. ज्याच्याकडे सहकार खातं आहे ते तिसऱ्या पायाला शेतकऱ्यांना मदत करू देण्यात अडथळे निर्माण करत आहे अशी टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
ताजी बातमी
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून मतदारांची नावे वगळणे अथवा मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन...
नगरमध्ये शाळेतच अल्पवयीन धर्मांतराचा प्रयत्न? आमदार संग्राम जगताप यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अहिल्यानगर : शहरातील एका खाजगी शिक्षणसंस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिचे इंटरनॅशनल कॉल...
अहिल्यानगर शहरातील हॉटेल्सची पाहणी करणार मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर - अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून...
चर्चेत असलेला विषय
थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,06,064 नवे रुग्ण, 439 जणांचा...
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात...
तोफखाना तोफखाना केंद्रात Group – C पदांच्या एकूण 107 रिक्त जागांची नवीन भरती सुरु..
तोफखाना केंद्र नाशिक अंतर्गत ग्रुप सी संरक्षण नागरी पदाच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे....
पुणे : 5 कोटींचे सव्वासहा हजार टॅब गेले कोठे?
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी आता ‘सीएसआर’चा फंडा
पुणे – महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना टॅब किंवा अन्य...
दिल्ली दारू धोरण प्रकरणात केसीआरच्या मुलीची चौकशी, पुन्हा समन्स
नवी दिल्ली: भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता यांची दिल्ली...





