भिंगार: वाहनअडून आरोपीवर प्राणघातक हल्ला ; भिंगार मध्ये घटनाअहमदनगर: भिंगार ठाण्याचे पोलीस फरार आरोपीला ताब्यात घेऊन जात असताना इतर पाच आरोपींनी पोलिसांचे वाहन अडवून त्या आरोपीवर प्राणघातक हल्ला केला.नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ रविवारी रात्री 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32 रा. मुकुंदनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार (22) हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता आरोपीच्या घरी गेले होते. त्याला घेऊन जात असताना पाच आरोपींनी भिंगार नाल्याजवळ पोलिसांचे वाहन अडवून सादिकला मारहाण केली. ही घटना मी प्रत्यक्षात पाहिली असल्याचे रुक्सार सादिक हिने फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेला सादिक याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताजी बातमी
आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडेवडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा...
Gold- Price: मोठी अपडेट समोर ! भविष्यात १० ग्रॅमचा सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या...
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी...
गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद
अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
चर्चेत असलेला विषय
उष्णतेचा इशारा: IMD ने या भागांसाठी ‘असामान्य’ तापमानाचा अंदाज वर्तवला आहे
अर्धा भारत थंडीच्या लाटेने ग्रासलेला महिनाही झालेला नाही, पण आता, त्यातील बहुतांश राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये तापमानात असामान्य वाढ...
रिअल इस्टेट बजेट 2024: अर्थमंत्र्यांकडून क्षेत्राला 8 गोष्टी अपेक्षित आहेत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राने परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येचा विस्तार,...
बस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित
मुंबई विमानतळ प्रशासनाचे सर्वेक्षण
मुंबई : बस, रेल्वेपेक्षाही विमानप्रवास सुरक्षित आहे, असे मत ९९ टक्के प्रवाशांनी सर्वेक्षणातून व्यक्त के...
हत्या, जमावाच्या हिंसाचाराने हिमाचल प्रदेशातील गाव हादरले, विभागले
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात २१ वर्षीय पशुपालकाच्या निर्घृण हत्येमुळे तणाव निर्माण झाला असून, गुरुवारी संघनी गावात जमावाने...




