पुणे: मोबाईल हिसकावण्याऱ्या एका सराईतासह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद

    833

    पुणे: मोबाईल हिसकावण्याऱ्या एका सराईतासह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद

    पुणे – मोबाईल हिसकावण्याऱ्या एका सराईतासह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना शनिवारी दुपारी कात्रज कोंढवा रस्त्यावर घडली होती.

    विवेक रमेश शेवाळे (19,रा.कात्रज), कृष्णा तानाजी जगताप(19,रा.कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील शेवाळेवर अगोदर एक हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी भरतकुमार माली(रा.कात्रज) सुतारकाम काम करतो. तो रात्री सव्वा बाराच्या सुमारास कात्रज तळ्याच्या जवळून जात होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा आरोपींनी त्याच्या दुचाकीला दुचाकी आडवी घातली. यानंतर शिवीगाळ करुन त्याच्याकडील सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. गुन्हा दाखल झाल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपींना अटक करण्यात आली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here