पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. पुणे तसंच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकानं सर्व दिवशी सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर कोरोना नियमांचं पालन करुन मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. दुकानं, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्क्यांच्यावर गेल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये, यासाठी कोरोना दक्षता नियमांचं काटेकोर पालन होणं आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर ५.५ आहे. पण तिथं लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही, याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे. पुण्यातील प्रमाण ३.३ आणि पिंपरी चिंचवड ३.५ आणि ग्रामीणचं संसर्गाचं प्रमाण ५.५ आहे. ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथं शिथिलता दिली जाणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच १९ ऑक्सिजन प्लांट सुरू झाले आहेत, ३४ प्लांन्ट प्रस्तावित आहेत, नजीकच्या कालावधीत ऑक्सिजन प्लांट गतीनं सुरू होतील. जिल्ह्याला ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या. हॉटेल आणि रेस्टॉरंटला ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे. प्रत्येक १५ दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणं बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त ४ वाजेपर्यंत खुले राहतील.
ताजी बातमी
बनावट पासपोर्ट प्रकरणात आझम खान यांच्या मुलाला खासदार-आमदार न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली
रामपूर. माजी मंत्री आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यांच्या अडचणी वाढत आहेत. बनावट पासपोर्ट प्रकरणात खासदार-आमदार न्यायालयाने...
“सौदी अरेबियाचा नवा निर्णय” हज यात्रेदरम्यान पती-पत्नी आता एकाच खोलीत राहू शकणार नाहीत.
सौदी अरेबियाने यावर्षी हज यात्रेच्या नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. पती-पत्नी आता...
चर्चेत असलेला विषय
राज्यात रात्रीची संचारबंदी? पुन्हा नवे निर्बंध लागू होणार..?
महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या...
बारावीच्या विद्यार्थिनीच्या मदतीला धावून आले मुंबई ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल
Mumbai Traffic Police: बारावीचा शेवटचा पेपर देण्यासाठी अल्पिता वनगे ही सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. पण चुकून ती दुसऱ्या बसमध्ये बसली आणि हे...
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई अहवाल
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई ▶️ युनिट - अहमदनगर▶️ तक्रारदार- पुरुष, वय-46 वर्ष. रा. खानापूर, ता:- श्रीरामपूर, जि.अहमदनगर▶️ आरोपी =विनोद मोगल सोनवणे, वय...
महाराष्ट्रातील दररोज कोविडची संख्या 27% वाढली आहे
मुंबई: महाराष्ट्रातील कोविड आलेखातील 'बुधवारचा उच्चांक' दैनंदिन संख्या झपाट्याने 925 पर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले—मंगळवारच्या 684 च्या तुलनेत 27% वाढ. मुंबईतील प्रकरणांमध्ये तितकीशी...







