पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींंचं ड्रग्स जप्त, पाच आरोपी अटकेत ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊ आणि मग त्या चौकशीत याचा छडा लावला जाईल, असा पोलीस आयुक्तांनी दावा केलाय. हे ड्रग्स कुठून आणि कशासाठी आणलं गेलं याबाबत आता विविध तर्क लावले जातायेत. बॉलिवूडचे लक्षही याकडे लागून राहिलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये सापडलेल्या मेफेड्रॉन ड्रग्सचं बॉलिवूडपर्यंत कनेक्शन आहे का? आणि हे ड्रग्स कुठून, कसं आणि कोणासाठी इथं आणलं होतं? तसेच अन्य कोणत्या शक्यता यामागे आहेत या सर्वांचा छडा लावून याच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे आयर्नमॅन म्हणून ओळखल्या जाणारे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केलंय. खबऱ्याच्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी खेड तालुक्यात सापळा रचला. तेव्हा चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एक चारचाकी आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी धूम ठोकली अन पोलिसांनी पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली असता पाच आरोपींकडून त्यात 20 कोटींचे 20 किलो मेफोड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलं. बेड्या ठोकलेल्या पाच आरोपींपैकी दोघे झारखंड आणि बिहारचे आहेत. पण सध्या ते नोएडामध्ये फार्मा डिस्ट्रिब्युटरचे काम करतात. तर अटकेत असलेले पुण्याच्या शिरूरमधील तिघांच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुटुंबीय ही चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. या ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊ आणि मग त्या चौकशीत याचा छडा लावला जाईल, असा पोलीस आयुक्तांनी दावा केलाय. एनसीबीच्या तपासात बॉलिवूडमधील मोठे मासे अडकलेत. त्यातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्सचे बॉलिवूड कनेक्शनची शक्यता आहे. त्यामुळे बॉलिवूडचं लक्ष या कारवाईकडे लागून आहे.
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
पोलीस मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कोल्हापूर येथे शाखा उद्घाटन सोहळा
पोलीस मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कोल्हापूर येथे शाखा उद्घाटन सोहळा पार पडला.
कोल्हापूर येथील...
अहमदनगर लसीकरण संबंधीत सूचना!
लसीकरण संबंधीत सूचना!बुधवार, दि. २८ जुलै २०२१ रोजी कोवॅक्सीन लसीकरणाचा दुसरा डोसखालील दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी १०० प्रमाणे ८०० डोसफक्त दुसरा...
एस जयशंकर यांनी युक्रेनच्या संघर्षावर तोडगा काढण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचे सांगत युद्ध नफाखोरीचा...
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत रशियन तेल खरेदीसाठी "युद्धात नफाखोर" असल्याचा युरोपचा आरोप...





