पिंपरी : करोनामुळे आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी – करोनामुळे आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी (दि. 23) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आता तीनवर गेली आहे.

पोलीस नाईक रमेश वामन लोहकरे (वय 37, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सहायक आयुक्‍त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहकरे हे चिंचवड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे 8 ऑक्‍टोबर रोजी त्यांना चिंचवडच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वी चाकण वाहतूक विभागात काम करणाऱ्या संतोष झेंडे यांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर आळंदी पोलीस ठाण्यात काम करणारे अंबरनाथ कोकणे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर केलेल्या चाचणीत ते करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. कोकणे आणि झेंडे यांच्या कुटुंबीयांना सकारी नियमाप्रमाणे 50 लाख रुपये मिळावेत, यासाठीचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाकडून गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here