पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील
कवठेपिराण,सावळवाडी,माळवाडी गावातील पूरस्थितीची केली पाहणी
पूरबाधितांना केले धान्य वाटप
सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जिल्ह्यामध्ये पूराचे पाणी संथगतीने ओसरु लागले आहे. तरीही नदी काठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे अशा गावांना सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसह इतरही समस्या निवारणासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु करावे अशा सूचना दिल्या.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील कवठेपिरान सावळवाडी, माळवाडी याभागाचा पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला. यावेळी कवठेपिराण येथे उपसरपंच भिमराव माने, सचिन पाटील, तर साळववाडी येथे सरपंच राजेंद्र उपाध्ये, उपसरपंच राहुल माणगावे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
कवठेपिरान येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी हिंदकेसरी मारुती माने यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन केले. गावातील पुरपरिस्थितीची पाहणी केले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे उपसरपंच भिमराव माने यांनी डेंग्यू, चिकन गुणिया सारखे रोग आले असून स्वच्छतेसाठी आम्हास मोठे फॉग मशीन उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी केली
पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाण्याने वेढलेली सावळवाडी व माळवाडी गावास मोटार सायकलवरून भेट देवून पुरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. महापूरामूळे बाधित झालेल्या कुटुंबाना शासनाने तात्काळ स्वरुपात 10 किलो गव्हू, 10 किलो तांदूळ व 5 किलो तूर मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यास अनुसरुन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज या धान्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये बाळगोंडा पासगोंडा पाटील, शालन बनगोंडा पाटील, बाबासो गबरु आवटी, त्रिशला भाऊसो पाचोरे, माणिकचंद्र गबरु आवटी यांना प्रत्येकी 10 किलो गव्हू, 10 किलो तांदूळ व 5 किलो तूरडाळीचे वाटप पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करुन सांगली जिल्ह्यामध्ये शासनाच्या मदत वाटपास सुरुवात करण्यात आली.
0000
Home महाराष्ट्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील कवठेपिराण,सावळवाडी,माळवाडी गावातील पूरस्थितीची केली पाहणी