दि. 16 ऑगस्ट 2021
पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारशी बांधवांसह सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल. राज्य आणि देश कोरोनामुक्ततेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करेल, अशा सदिच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. *