पाणलोटात पाऊस सुरूच; निळवंडे, भंडारद-यातून नदीपात्रात विसर्ग; प्रवरेला पूर

915
निळवंडे धरणातून १२ हजार ९४५ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. तालुक्यातील कोकणेवाडी, निंब्रळ, इंदोरी, अगस्ती पुलांवरून पाणी वाहत आहे. भंंडारदरा धरणात ९८ टक्के तर निळवंडे धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

गेल्या चोवीस तासात घाटघर येथे २५० तर रतनवाडी २२५ मिलीमीटर पाऊस कोसळ्याची नोंद रविवारी सकाळी झाली आहे.भंडारदरा धरणात १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.  विद्युत गृह -१ मधून ८१६ व स्पिलवे वरून ६ हजार ९२४ क्युसेक असा एकूण ७ हजार ७५० क्युसेकने विसर्ग सुरू  सुरू आहे धरणात २४ तासात ५९५  दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे.  वाकी तलावतून २ हजार ५४५ क्यूसेकने ओव्हर फ्लो विसर्ग निळवंडे धरणात जमा होत आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ७ हजार २०८ दशलक्ष घनफूट  झाला आहे. विद्युत गृह केंद्रातून ७१० व सांडव्यातून १२ हजार २३५ असा एकूण विसर्ग १२ हजार ९४५ क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी झेपावले आहे कोतूळ येथे मुळा नदी विसर्ग ८ हजार ३७३ क्युसेक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here