पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत विविध व्यवसायासाठी कर्ज लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

715

पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत विविध व्यवसायासाठी कर्ज
लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

अहमदनगर – केंद्र शासनाने सन 2020-21 या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नविन योजनेस मंजूरी प्रदान केली असून सन 2021-22 या वर्षात सदर योजने करीता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. या योजनेचा व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक, संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत दुध प्रक्रिया (आईस्क्रीम, चीज निर्मिती, दुध पाश्चराईजेशन, दुध पावडर इ.) मांस निर्मिती व प्रक्रीया व प्रक्रीया पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून व्याज दरांमध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे. योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना केंद्रशासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली असून या योजनेच्या मार्गदर्शक सुचना मराठीत प्रसिध्द करण्यात येत आहेत.
केंद्र शासनाने वर नमुद केलेल्या उद्योग व्यवसायासोबत आयव्हीएफ, पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन या बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे. ***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here