अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, खासगी रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये बेड शोधण्याची पाळी रुग्णांवर आली आहे. मध्यंतरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पवार यांनी जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स पाठविले आहेत. ते गरीब रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी संग्राम जगताप यांनी शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सरकारने तत्काळ पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रेमडेसिवीरचा साठा नगरकरांसाठी पाठविला असून, तो गरजू रुग्णांना मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप यांनी इंजेक्शन्सचा साठा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या वेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भूपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडेवडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा...
Gold- Price: मोठी अपडेट समोर ! भविष्यात १० ग्रॅमचा सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या...
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी...
गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद
अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
चर्चेत असलेला विषय
Nagpur Covid : विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोना चाचणी, मनपाचा...
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची...
Corona : तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही झाला...
नवी दिल्ली - जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे...
पाच हजारांची लाच घेताना चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात
पाच हजारांची लाच घेताना चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात
पिंपरी : तक्रारी अर्ज आणि पोस्ट मार्टम नोट्स...
“तो मीच का नसावा?”: कमल हासन काँग्रेसकडून तिकिटाची अपेक्षा करत आहेत
चेन्नई: इरोड पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस-डीएमके युतीचे उमेदवार ईव्हीकेएस एलांगोवन यांना पाठिंबा देणारे अभिनेते-राजकारणी कमल हसन यांनी बुधवारी...





