परदेशात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

643

परदेशात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर :- आदिवासी विकास विभागामार्फत परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2021-22 मध्ये संपुर्ण राज्यातून परदेशात एम.बी.ए. वैद्यकीय अभ्यासक्रम, बी.टेक (इंजिनिअरिंग), विज्ञान, कृषी इतर विषयाचे अभ्यासक्रम या अभ्यासक्रमास पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती करिता 10 विद्यार्थ्यांची शासनाने विहित केलेल्या निकषावरुन निवड करण्यात येणार आहे.तरी जिल्हयातील विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूरचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी केले आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी अटी, शर्ती व विहित नमुन्यातील आवेदन (अर्ज) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक, अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांचे कार्यालयात तसेच संबंधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर ता. अकोले, जि. अहमदनगर कार्यालयात कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02424-251037 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here