अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे पद नसताना लेटरहेड वापरणाऱ्या व्यक्तींना राज्य कार्यालयाकडून पत्र देऊन सुचित करण्यात आले आहे. तसेच या नंतर असे पद नसताना लेटरहेड वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारिपचे लेटरहेड वापरणारे वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीचे लेटरहेड वापरायला लागले. पद नसतात आणि आधिकृत पक्षाची मान्यता नसताना पक्षाच्या नावावर गैरवापर करत आले होते. या सर्वांना अनेक वेळा सुचना करून ही या लोकांनी या नसलेल्या पदाचे लेटर पॅड वापरणे बंद केले नव्हते त्या सर्वांना प्रदेश पक्ष कार्यालयाकडून वैयक्तिक पत्र पाठवले आहे आणि प्रसिद्धी साठी सुध्दा त्यांच्या नावासह प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यामध्ये पुढील प्रमाणे पक्षाचे पद नसताना लेटर पॅड वापरणाऱ्या लोकांची नावे आहेत. *सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे,संदीप गायकवाड, विजय गायकवाड, जीवन कांबळे,विनोद गायकवाड(स्टेशन), सुनील गट्टानी* यांची नावे असून या लोकांनी केलेल्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहारास पक्ष जबाबदार नाही. असे पक्षाच्या रेखा ठाकूर ,राज्य महिला अध्यक्ष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिले आहे.
- Crime
- Cyber crime
- health
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- खेळ
- ठाणे
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- पाककृती
- मनोरंजन
- राजकारण
- लाईफस्टाईल