पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी, गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्च करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

694

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, इतर अधिकारी यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.

कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्च करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत मंजुरी दिली. राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, कोरोनाबाधितांच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोराना चाचणीवर द्यावा, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी, तसेच राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Ajit Pawar Rajesh Tope Dr.Rajendra B. Shingne

#COVID19 #Mucormycosis #MVAFightsCorona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here