नीट’ परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
? नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)द्वारे आज रविवारी नागपूरसह देशातील १५५ शहरांत घेण्यात आलेली नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेन्स टेस्ट (नीट) शहरात ६४ केंद्रांवर शांततेत पार पडली. मात्र, पेपर संपल्यावर केंद्रांसमोर वाहने आणि नागरिकांनी गर्दी केल्याने ‘सोशल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा उडाला. शहरात २५ हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
? ‘नीट’साठी दुपारी दोन वाजता पेन अँड पेपर बेस परीक्षेस सुरुवात झाली. त्यासाठी केंद्रावर दीड वाजतापर्यंत प्रवेश देण्यात आला. दरम्यान, सर्व केंद्रांवर सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, थर्मल स्कॅनिंगची सोय करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगसाठी एक वर्गात १२ विद्यार्थी बसविण्यात आले होते. पाच वाजता पेपर सूटताच केंद्राबाहेर पालकांनी आपल्या वाहनांसह एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
? दुपारी सोशल डिस्टॅन्सिंगचे पालन करून नवा आदर्श निर्माण केला; मात्र पेपर सुटताच गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसले. दरम्यान, परीक्षेत बायोलॉजीचे प्रश्न सोपे तर केमिस्ट्रीचे प्रश्न काहीसे कठीण आणि फिजिक्स विषयाचे प्रश्न सोडविण्यात विद्यार्थ्यांना खूप वेळ द्यावा लागला.