- शनिवार (दि.९) राञी ११.५१ वाजण्याच्या सुमारास घरी असताना, माझ्या मोबाईलवर मी गुन्हेगार क्रिमिनल आहे, मल तुझी सुपारी मिळाली आहे, मी तुझा मर्डर करणार आहे” अशी धमकी त्याच्या मोबाईलवरून दिली आहे, असा तक्रार अर्ज आकाश पवार (रा.गोपाळगल्ली, केडगाव अहमदनगर) याच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात नगरसेवक अमोल येवले यांनी सोमवारी (दि.११) दिला आहे.
- कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नगरसेवक श्री येवले म्हणाले आहे की, त्याचा चुलत भाऊ सचिन पवार यास फोन केला, तेव्हा सचिन पवार हा मला म्हणाल की, आकाश म्हणत होता की, मल अमोल येवलेची ३ कोटीची मर्डरची सुपारी आलेली आहे. यानंतर गल्लीतील ‘मिठू नेटके याचा सचिन पवारशी बोलताना वेटींग फोन येत होता. परत मी त्याला फोन केला असता, मिठू नेटके म्हणाला की, आकाश तुम्हाल शोधत होता व फोन लावून त्याला बालून घे, मला त्याचा कार्यक्रम करायचाय. असा म्हणत होता. असे त्याने सांगितले. यानंतर माझा मिञ अभिजीत कोतकर याचा फोन आला, तुझे कुठे भांडणं झालं आहे काय ?, त्यावर मी नाही, असे म्हटले. पण अभिजीत याने मला पुन्हा फोन करून सांगितलं की, हाॅटेलवर तीनजण तोंड बांधून आले होते. ते अमोल येवले आहे का?, असे विचारीत होते. तुम्ही येथून गायब व्हा, त्याचा इथे मॅर्डर होणार आहे. यानंतर ते गोंधळ करून निघून गेले, असा उल्लेख नगरसेवक श्री येवले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.