नक्षलवादी हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद

    छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात 1 जवान शहीद झाले आहेत. या विस्फोटात सीआरपीएफ कोबरा 206 बटालियनचे 10 जवान जखमी देखील झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,

    रात्री माओवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले. या घटनेनंतर तात्काळ साऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांचे निधन झाले.

    या घटनेबाबत जिल्ह्यातील पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितलं की, सीआरपीएफच्या 206 कोबरा बटालियनच्या जवानांना पेट्रोलिंग करता सुकमा जिल्ह्यात रवाना करण्यात आलं होतं. या दरम्यान नक्षलवाद्यांनी ताडमेटला गावाजवळ स्फोट घडवून आणला.

    शहीद झालेले नितीन भालेराव हे नाशिकमधील इंदिरानगरमध्ये राहणारे होते. शहीद नितीन भालेराव गेल्यावर्षी पास आऊट होऊन कोबरा बटालियनमध्ये दाखल झाले होते.

    त्यांचे पार्थिव रायपूरवरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल. तेथून ते नाशिक येथे रवाना होईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामात केला जाणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here